धाराशिव (प्रतिनिधी)- शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक अमोल बाळे, अधीक्षक अभियंता मकरंद आवळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे, प्राचार्य मारुती बिरादार, शासकिय तंत्र निकेतांचे प्रदीप कुदळे, नामवंत उद्योजक चंदन भडंगे, तेरणा चे समनव्यक बी. एच. जैन हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्याच प्राचार्य केशव पवार, संजय माळकुंजे, हर्षद राजुरकर, संतोष कांबळे, संतोष कदम हे उपस्थित होते.
दिप प्रज्वलनाने कार्यकर्माची सुरुवात झाली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन कुशल मनुष्यबळ निर्मिती होत असते. तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच टिम वर्क, टाईम मॅनेजमेंट, स्पर्धात्मक चाचणी, सादरीकरण, स्ट्रेस मॅनेजमेंट हे गुण विकसित होण्यासाठी हे तंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. व्यक्तिमत्त्व विकास व व्यवसाय गुण वाढवण्यासाठी हे तंत्र प्रदर्शन उपयुक्त ठरले.
या तंत्र प्रदर्शनात बारा औद्योगिक संस्थेतुन चाळीस मॉडेल्सनी सहभाग नोंदवला. यातुन दहा मॉडेल्सची राज्य स्तरावर निवड करण्यात आली. आठ बिगर अभियांत्रिकी व बत्तीस अभियांत्रिकी मॉडेल्स व उपकरणे यांनी सहभाग नोंदवला. यात बिगर अभियांत्रिकी गटातुन औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशीच्या मुलींनी व अभियांत्रिकी गटातुन औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिवच्या मुलांनी बाजी मारली. चाळीस मॉडेल्स मधुन दहा मॉडेल्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यात आधुनिक कोळपणी, मळणी, खत टाकणे व फवारणी यंत्र याने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. चालता बोलते मॉडेल पाहण्यासाठी अनेकानी गर्दी केली होती. स्वयंचलित मिरची कांडप यंत्र व मोशन सेन्सर हे अत्यन्त कमी खर्चात तयार होणारे वीज बचत करणारे उपकरण यांसारखे अनेक मॉडेल्स व उपकरणे मांडण्यात आली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटनिदेशक फतेसिंग जगताप, भारत जाधव, सखाराम राऊत, अच्युत सरवदे शिल्प निदेशक रघुवीर येरकळ, किरण झरकर, लक्ष्मण निर्मळ, बालाजी वाघमारे, आयुब शेख, राजीव गायकवाड,सौ. उषा जगदाळे, श्रीमती सुषमा क्षिरसागर, सौ शिल्पा बोर्डे, कौसर जुबेरी, कार्यालयीन कर्मचारी विजयकुमार धनशेट्टी, शंकर जाधव, सत्यशील नळदुर्गकर, पांडुरंग भोकरे यांनी मेहनत घेतली. सुत्र संचालन श्रीमंत ओव्हाळ व पवन नाईकवाडी यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य हर्षद राजुरकर यांनी केले.