भूम (प्रतिनिधी)-संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘चोखोबा ते तुकोबा' या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा प्रारंभ सोमवार, दि. 1 जानेवारी 2024 रोजी श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे होणार असून समारोप शुक्रवार, दि. 12 जानेवारी 2024 रोजी जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जन्मभूमी असलेल्या देहूगाव येथे होणार आहे. संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

‌‘चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची 2024 'चे यंदाचे 6वे वर्ष आहे. ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, माकणी, उमरगा, नाईचाकूर, औसा, लातूर, तेर, धाराशिव, कसबे तडवळे, येरमाळा, वाशी, भूम, पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, बोधेगाव, पैठण, संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे जाणार आहे. वारी 8 जिल्ह्यातून 1350 किलोमीटर प्रवास करणार आहे. 

चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समितीच्या अध्यक्षा प्रा. अलका सपकाळ यांनी आज समितीची राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली. कार्यवाहपदी डॉ. संदीप सांगळे, शरदराव गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, महारुद्र जाधव, कोषाध्यक्ष संपतराव देशमुख, अमोलदादा निकाळजे, सदिच्छा दूत कवी समाजप्रबोधनकार फुलचंद नागटिळक, निमंत्रित सदस्य जयराज शेंबडे, सतीश दत्तू, राजेंद्र गपाट, डॉ.राजश्री तावरे, विजयराव जगदाळे, विनायकराव राऊत, ज्ञानेश्वर वाघ, रोहित मुंडे, मुख्य समन्वयक प्रा, सिद्धेश्वर माने,सह समन्वयक अमर वाघमारे शंकरराव खामकर, महादेव ढेंबरे आदिंचा समावेश आहे . सदरील समता वारीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. अलका सपकाळ यांनी केले.


 
Top