धाराशिव (प्रतिनिधी)- पंजाबी युनिव्हर्सिटीच्या वतीने पतियाळा (पंजाब) येथे 28 ते 31 डिसेंबर 23 दरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विध्यार्थी व धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा खेळाडू सौरभ सारफळे याची निवड झाली आहे.

गुरु काशी विद्यापीठाच्या वतीने भटिंडा येथे झालेल्या साऊथ वेस्ट झोन अंतर विद्यापीठ अजिंक्यपद स्पर्धेतून सौरभ सारफळे याची अखिल भारतीय अंतर विद्यापीठ धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सौरभ यास धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक प्रवीण गडदे, सहसचिव तथा मुख्य प्रशिक्षक अभय वाघोलीकर, तांत्रिक समिती सचिव तथा प्रशिक्षक कैलास लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

दरम्यान अखिल भारतीय अंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी सौरभ सारफळे ची निवड झाल्ल्या बद्दल त्याचा आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला यावेळी सरपंच सुनील गरड, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, प्रशिक्षक कैलास लांडगे आणि सतीश सारफळे आदींसह खेळाडूंची उपस्थिती होती.


 
Top