धाराशिव (प्रतिनिधी)- जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर  ता. धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या नमो कबड्डी खुल्या कबड्डी स्पर्धेचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. विजयी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

या स्पर्धेत बावी येथील कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवून रोख स्वरूपात 3001 रुपयाचे बक्षीस पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दुसरा क्रमांक नांदुर्गा कबड्डी संघाने पटकावला असून, त्यांना रोख स्वरूपात 2001 रुपयाचे पारितोषिक वितरण डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाषदादा कोळगे व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी तसेच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामदास कोळगे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.


 
Top