धाराशिव  (प्रतिनिधी) - लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत एका व्यक्तीने जबरदस्तीने त्या महिलेवर वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी ॲड.अमोल वरुडकर यांनी आरोपीच्यावतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन व सबळ पुराव्या अभावी त्या गुन्ह्यातून त्या आरोपीची जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील फकीरा नगर येथील एका महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवून जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले असा आरोप करीत एका पुरुषा विरुध्द धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 14/2023 कलम 376 (1), 376 (2) (), 417, 323 भादंवि नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र या प्रकरणी ॲड अमोल वरुडकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात बाजु मांडली. तर सरकार पक्षाच्यावतीने साक्षीदार व पुरावा सादर करण्यात आला. या प्रकरणात विविध मुद्द्यावरती युक्तिवाद करण्यात आला. ॲड. वरुडकर यांनी आरोपीच्यावतीने सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून  जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी आरोपीला या प्रकरणात सबळ पुराव्या अभावी रोजी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात ॲड. अमोल वरुडकर यांना ॲड. भाग्यश्री. कदम, ॲड. वैभव खांडेकर, ॲड. संजय व्हटकर, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. जनक साळुंखे ॲड. रजनीकांत ढेकणे ॲड. बालाजी पोतदार  ॲड. विक्रम माने ॲड. सचिन जाधव यांनी सहकार्य केले.


 
Top