तुळजापूर (प्रतिनिधी)-   दहा व वीस  रु. ची नाणी न  स्वीकारणा-या  व्यक्ती संस्था,बँका ह्या कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहेत. त्या मुळे दहा वीस रुपयाचे चिल्लर नाणे न स्विकारणा-यांना आता कायदेशीर कारवाई स सामोरे जावे लागणार आहे.

दहा वीस रुपयाचे नाणे प्रथमता ग्रामीण भागातुन आठवडा बाजार व्यापारी वर्गाने न स्विकारल्याने याचे लोण तालुका पर्यत पोहचले हे वाढतच आहे. त्यामुळे भारतीय चलन कायदेशीर पणे अस्तित्वात असताना ते  चलनातुन बाद होवु पाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी यांनी  धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बँकांना कळविले आहे कि,रुपये 10 व रुपये 20 ची नाणी ही बँकांकडून स्वीकारली जात नाहीत. या प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. बँका नाणी स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरीक व छोटे मोठे व्यापारी सुद्धा नाणी स्वीकारत नाहीत या प्रकारच्या तक्रारी येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार रुपये 10 व रुपये 20 ची नाणी ही वैध चलन मुद्रा असून जिल्ह्यातील सर्व बँक शाखांनी रुपये 10 व रुपये 20 च्या नाण्यांच्या वापरबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी व बँकेत नाणी स्वीकारण्यास टाळाटाळ करू नये. बँक शाखेच्या बाहेर, परिसरात या संदर्भातील बॅनर, लीफलेट लावावीत. बँकांनी त्यांच्या ग्रामीण भागातील यंत्रणांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत रुपये 10 व रुपये 20 ची नाणी ही वैध चलन मुद्रा असल्याबाबतचा संदेश पोहचवावा. रुपये 10 व रुपये 20 ची नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्ती/संस्था/बँका ह्या कायदेशीर कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी. असे आवाहन प्रसिद्धी पञकाध्दारे केले आहे.


 
Top