तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यात बहुचर्चित असलेल्या येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार सर्वसामान्यांचे कामे वेळेवर केले जात नसल्याने चर्चत आला आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी की, खडकाळ गल्ली तुळजापूर येथील मोहन भिवाजी हातागळे यांनी 23/6/2022 रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडे भुमापन मोजणी क्रमांक 1614 या जागेसाठी मोजणी शुल्क भरले आहे. परंतु आज रोजी पर्यंत मोजणी झालेली नाही. या बाबतीत मोहन हातागळे कार्यालयाकडे सदर मोजणी भूमापन क्रमांक सदर प्रकरणी आपल्या कार्यालयास वेळोवेळी येऊन समक्ष दहा ते पंधरा वेळी कार्यालयात चकरा मारुन प्रत्यक्ष भेटुन झाले आहे. तरीदेखील आपल्या कार्यालयाने दखल घेतलेली नाही. तरी आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की, आपण पत्र मिळताच सात दिवसाच्या आत लेखी खुलासा करावा. अन्यथा आपणा विरुद्ध न्यायालयात दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी. तसेच पुढील होणाऱ्या परिणामास आपण व आपले कार्यालयात जबाबदार असेल. असा इशारा निवेदनाद्वारे मोहन भिवाजी हातागळे, खडकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, तुळजापूर यांनी तालुका भूमीअभिलेख कार्यालय प्रमुख यांना दिला आहे.