तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्याच्या इतिहासात प्रथमच: ज्वारीचे भाव सहा हजारावर गेले होती .सध्या तुळजापूर कृषीउत्पन्नबाजारसमिती मध्ये तालुक्यातुन  ज्वारीची आवक कमी असल्याने ज्वारीची दरवाढ झाली आहे.सध्या दहा ते पंधरा क्विंटल आवक आहे. यावर्षी पाऊस कमी व सुरुवातीला दडी मारल्याने ज्वारी पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे ज्वारीला मागणी वाढली आहे. चांगला भाव मिळत असल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी खुशीत आहेत.

बाजारात ज्वारीची आवक कमी असून, दर वाढू लागले आहेत. त्यामुळे  कृषी उत्पन्न बाजार समितीत मालदांडी ज्वारीला तब्बल सहा  हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.पुढील काही महिने बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक बळीराजा सुखावला असला तरी गोरगरीब कष्टकऱ्यांची भाकरी मात्र आता महाग झाली आहे.

यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला त्यातच सोयाबीनचा विक्रमी पेरा झाल्याने ज्वारी क्षेञ घटले. त्यामुळे मागणी तसा पुरवठा होत नसल्याने तुळजापूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच ज्वारी भाव खाऊन जात आहे. सध्या दगडी ज्वारीला 5800ते 6000, मालदांडी ज्वारी 5200ते 5500, बारीक ज्वारीला पाच हजारचा आत भाव मिळत आहे. ज्वारीला सर्वाधिक उपयोगी आरोग्यदायी धान्य मानले.

जाते. ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि जस्त यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे. त्यामुळे ज्वारी भाकरी खाणा-यांच्या संखेत वर्षानुवर्षे वाढ होत आहे. त्यामुळे गरीबाची समजली जाणारी ज्वारीची भाकरी यंदा श्रीमंताची बनली आहे. सध्या बाजार समितीत सध्या गहू 3 हजार ते 3,250 रुपये प्रतिक्विटलने विक्री होत आहे. तर ज्वारीचा दर 5 ते 6 हज़ार रुपयांदरम्यान आहे. यंदा गव्हापेक्षा ज्वारीच अधिक भाव खात आहे. गतवर्षी राज्यात सर्वत्र उत्पादन कमी झाले आहे. यामुळे पुढील वर्षभर ज्वारी यावर्षी नोव्हेंबरमध्येच तुटवडा निर्माण झाला आहे. आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे यंदा ज्वारी भाव खाणार आहे. फायदा शेतकऱ्यांना होत आहे. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांना याचा तोटा सहन करावा लागत आहे. 


ज्वारीचा उपलब्ध असलेला साठा कमी होत चालला आहे. यावर्षीही अवकाळीमुळे उत्पादन कमीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षभर ज्वारी भाव खाण्याची शक्यता आहे.ज्वारीला भाव आल्याने यंदा माञ रबी ज्वारी क्षेत्र वाढले आहे.


 
Top