धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षणाबरोबर क्रीडा, संगीत, नाटक, तंत्रज्ञान, चित्रकला यामध्ये चौफेर प्रगती केली पाहिजे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे ,असे मार्गदर्शन मुख्याध्यापक शिंदे कुमंत यांनी  विद्यार्थ्यांना केले.

 शिंगोली आश्रम शाळेत वीर बाल दिन उत्साह साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष.मुख्याध्यापक शिंदे कुमंत व पर्यवेक्षक शेख अब्बास अली, रत्नाकर पाटील, सतीश कुंभार यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ते बोलत होते. दीपक खबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी सूर्यकांत बडदापुरे, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, प्रशांत राठोड, चित्तरंजन राठोड, शानिमे कैलास, अमदापुरे मदन कुमार, श्रीमती सुनिता व्यवहारे, साने मॅडम, शानिमे, सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी व कर्मचारी गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, रेवा चव्हाण, अविनाश घोडके, मस्के मामा व कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ज्योती राठोड यांनी मानले.


 
Top