धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. पंजाबराव देशमुख यांनी गरिबांना शिक्षण देण्यासाठी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शाळेची स्थापना केली. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात  सोडविले. शेतकऱ्यांसाठी अनेक उपाय योजना, मदत शासन स्तरावरून मिळून देण्यात आली. संत गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर होता. त्याचप्रमाणे त्यांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशहितासाठी कार्य केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा विचाराचा वारसा डोळ्यासमोर ठेवून देश कार्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन पाटील रत्नाकर यांनी केले.

शिंगोली आश्रम शाळेत डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी गंगावणे साहेब, वैद्यकीय अधिकारी, येडशी, प्रमुख अतिथी, मुख्याध्यापक. शिंदे कुमंत, पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून, नारळ फोडून पूजा केली. यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कुंभार यांनी केले. कार्यक्रमासाठी सूर्यकांत बडदापुरे, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, प्रशांत राठोड, चित्तरंजन राठोड, शानिमे कैलास, अमदापुरे मदन कुमार, विशाल राठोड, श्रीमती सुनीता व्यवहारे मॅडम, सुरेखा कांबळे मॅडम, श्रद्धा सूर्यवंशी मॅडम, ज्योती मॅडम व कर्मचारी गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, रेवा चव्हाण, अविनाश घोडके, मस्के मामा, आडे लिंगा, अमोल जगताप, इत्यादी कर्मचारी व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती. दीपक खबोले  यांनी आभार मानले.  


 
Top