धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आणि जिल्हा विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एकदिवसीय विधी साक्षरता शिबिर संपन्न झाले.
सदर शिबिरात बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 याबाबत ॲड मोहिनी शिरुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, रॅगिंग विरोधी कायदे व नियम याबाबत ॲडवोकेट विशाखा बंग यांनी मार्गदर्शन केले तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री वसंत यादव यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या दैनंदिन जीवनात कायद्याचे पालन कसे करावयाचे याबद्दल मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून विधी साक्षरता ही काळाची गरज आहे या विषयावर आपले मौलिक विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.डी. जगताप हे होते. त्यांनी अध्यक्ष समारोप करताना लैंगिक गुन्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा.डॉ. वैभव आगळे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी. एस. सूर्यवंशी उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.