भूम (प्रतिनिधी)-श्रीक्षेत्र आलमप्रभू देवस्थान भूमची यात्रा दर सालाप्रमाणे यावर्षीही दिनांक 30 डिसेंबर ते दि. 1 जानेवारी 2024 रोजी पार पडणार असल्याचे देवस्थान विश्वस्त मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. यात्रेत दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

गुरुवार दि. 28 डिसेंबर रोजी कोटीचा बाजार कोटीची नंदीवरून दुपारी चार वाजता मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवार दि. 30 डिसेंबर रोजी श्रींची सायंकाळी सहा वाजता रथामधून मिरवणूक तसेच रात्री 8 वाजता शोभेची दारू उडविण्यात येईल. रात्री साडेआठ वाजता हभप विनोदाचार्य मधुकर महाराज सायाळकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम होईल. रविवार दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता गरुड देवाची श्रीकृष्ण मंदिर कसबा येथून न. प. पर्यंत मिरवणूक काढण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता श्रींची काळवीटावरून मिरवणूक तर गांधी चौकात मल्लखांब, लाठी फिरवणे, रात्री आठ वाजता शोभेची दारू उडवण्यात येणार. 

रात्री 8.30 मिनिटांनी वाजता लावणी सम्राज्ञी पूनम कुडाळकर यांचा हिंदी मराठी लावणी गीतांचा कार्यक्रम श्री गुरुदेव दत्त हायस्कूल प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 1 जानेवारी रोजी श्रींची गरुड देवाची रथा मधून मिरवणूक होईल. दुपारी 12 वाजता आलमप्रभू देवस्थान येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी 2 वाजता जंगी कुस्त्याचे भव्य मैदान, सायंकाळी 6 वाजता श्रींची सिंहावरून मिरवणूक तर रात्री आठ वाजता शोभेची दारू उडविली जाणार आहे. रात्री 8.30 वाजता सिनेतारका लावणी सम्राज्ञी सायली, पूजा, राणी, प्रतीक्षा, श्रुती, राधिका यांचा संच लावण्यचंद्रा लावणी कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 2 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता श्रींची सिंहावरून मिरवणूक व सकाळी 7 वाजता आरती होवून यात्रेची सांगता होणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले आहे.


 
Top