भूम.(प्रतिनिधी)-तालुक्यातील हाडोंग्री येतील नवनिर्वाचित सरपंच उल्का सत्यवान मगर यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भगवंत विद्यालय हाडोंग्री या संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य मुक्ताप्पा तळेकर, अनिल तळेकर, संदीप मगर, मुख्याध्यापक नवनाथ डांबरे, राजेंद्र जावळे, किसन तळेकर, शांतलिंग घोंगडे ,बापू वाघमारे ,अभिमन्यू महाडिक ,गणेश खरात, प्रकाश भाले, रमेश सुतार ,रेवन बिडवे, सुधीर शिरसागर ,श्रीमती कवडे मॅडम, रामा सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश पवार यांनी केले.