धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक शनिवारी 30 डिसेंबर रोजी वसंत स्मृती दादर मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केमवाडी ता.तुळजापूर येथील भाजपचे नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांची महाविजय-2024 सुपरवारीयर्स मराठवाडा-विभागीय सहसमनव्यक पदी नियक्ती केली आहे.

भाजपा नेते ॲड. अनिल काळे यांच्या या नियुक्तीमळे मराठवाडा पातळीवर काम करण्याची खूप मोठी जबाबदारी देऊन संधी दिली आहे. ॲड. काळे यांच्याकडे मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील 100 सक्षम कार्यकर्ते म्हणजे सुपरवॉरिअर्स यांना कामास लाऊन सक्षम करणे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार  निवडून येतील अशा प्रकारची जबाबदारी मिळाली आहे. ॲड. काळे हे भाजपाचे एकनिष्ठ नेते असून ते मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, मा.विक्रमदादा पाटील यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या  आहेत. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, आ. आशिष शेलार, आ.श्रीकांत भारतीय, आ. प्रवीण दरेकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ..सुजितसिंह ठाकूर, ॲड. मिलिंद पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


 
Top