धाराशिव (प्रतिनिधी)- परमात्म्याच्या चिंतनातच सुख, शांती,समाधान आह़े जे परमात्म्याचे नाम घेतात़ त्याचे गीत गातात व त्याच्या नामाचा आनंदाने जयघोष करतात़त्यांचे दोष आपोआप हरले जातात़ त्यांच्या पदरी पुण्य येते असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप भारत कोकाटे महाराज यांनी केल़े

धाराशिव शहरातील श्री सद्गुरू कॉलनी, भानुनगर येथे भगवान श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री दत्त नाम सप्ताह सोहळ्यात मंगळवारी (द़ि 26) हभप कोकाटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल़े यावेळी त्यांनी

कृष्ण गोकुळी जन्मला | दुष्टां चळकांप सुटला ॥

होता कृष्णाचा अवतार | आनंद करिती घरोघर ॥

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केल़े ते म्हणाले, श्रीकृष्णाचा जेव्हा गोकुळात जन्म झाला तेव्हा  दुष्टांचा थरकाप उडाल़ा कृष्णाचा अवतार होताच लोक आनंदी झाल़े जगाच्या उध्दारासाठीच परमात्मा अवतार घेत असत़ो, असे प्रतिपादन त्यांनी केल़े यावेळी हभप कोकाटे महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याचे वाटप करण्यात आल़े काला व महाप्रसाद वाटपाने या सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात आल़ी यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी आभार मानले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत़े 

सप्ताह सोहळ्यानिमित्त 19 ते 26 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाल़े सोमवारी (द़ि.25) सायंकाळी भजनसंध्या कार्यक्रम घेण्यात आल़ा. यावेळी हभप शिवकुमार मोहेकर यांनी भक्तीगितांचे उत्कृष्ट सादरीकरण केल़े. मंगळवारी पहाटे श्री दत्तगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त अभिषेक करण्यात आल़ा. सकाळी टाळ, मृदंगाच्या गजरात भव्य गुरूचरित्र ग्रंथदिंडी  काढण्यात आल़ी. भाविकांनी उत्स्फूर्तपणे या मिरवणुकीत सहभाग घेतल़ा ठिकठिकाणी या दिंडीच्या स्वागतासाठी महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढली होत़ी. सद्गुरू रामानंद महाराज वारकरी शिक्षण संस्था काजळा, हभप रावसाहेब बाबा पाटील महाराज शिक्षण संस्था मेडसिंगा, श्री संत नारायणबाबा रामजीबाबा वारकरी शिक्षण संस्था वाणेवाडी येथील  बालवारकयांनी टाळमृदंगाच्या गजरात  अभंगाच्या तालावर रिंगण करून उत्कष्ट सादरीकरण केल़े अ़ा राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, यशवंत मल्टीस्टेटचे चेअरमन सतीश दंडनाईक, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, राजसिंह राजेनिंबाळकर यांनी या सप्ताह सोहळ्यास भेट दिल़ी.


 
Top