तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील काटगाव मधील मारुती मंदिर ते धनगर डीपी मार्ग जुन्या महादेव मंदीराकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा केला जात असल्याने हा रस्ता दर्जेदार करण्याची मागणी ग्रामस्थांन मधुन केली जात आहे. 

तुळजापूर तालुक्यातील काटगाव हे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र हद्दवरचे तुळजापूर तालुक्यातील अखेरचे गाव आहे. या गाव अंतर्गत मारुती मंदीर ते धनगर डीपी मार्ग जुन्या महादेव मंदीराकडे जाणारा रस्ता पहिला कच्चा रस्ता होता. त्यावर दगड, मुरुम टाकुन सिमेंट पसरले जात आहे. सदरील रस्ता हा डबल लियरचा करणे गरजेचे असताना थातुरमातुर पध्दती केला जात आहे. सदरील रस्ता निकृष्ट दर्जाचा केला गेला तर पुन्हा काटगाव ग्रामस्थांचा नशीबी दगड धोंड्याचा रस्ता येणार असल्याने सदरील रस्ता अंदाजपंञक नुसार करावा व अंदाजपञक नुसार दर्जेदार झाला तरच याचे बिल अदा करावे. सध्या चालु असलेल्या रस्ता कामाची गुणनियञक पथकामार्फत तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधुन केली जात आहे.


 
Top