धाराशिव (प्रतिनिधी)-यशश्री क्लासेसचे प्रा. रवि शितोळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र विषयांमध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळाली. “क्रिस्टलोग्राफीक मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ डोपड फॅराएट फॅब्रिकेटेड बाय सोल जेल टेक्निक्स“ यावर संशोधन पुर्ण केले.

संशोधन पूर्ण करत असताना त्यांनी तीन शोध निबंध इंटरनॅशनल जर्नल मध्ये प्रकाशित केले. त्यांचे हे संशोधन प्रा. डॉ. राम कदम सर, श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यासाठी त्यांना डॉ. सागर सिरसाठ, डॉ. संतोष वडगणे व डॉ. शिरीष चौधरी यांचे सहकार्य मिळाले.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


 
Top