तुळजापूर - तालुक्यातील धनेगाव येथे श्रीदत्तयंती निमित्ताने मार्गशिर्ष शुध्द बुधवार दि. 20ते मंगळवार  दि 26 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित केला आहे. यात  दैनंदिन पहाटे काकडा आरती, सकाळी 7 ते 11 गुरुचरित्र पारायण, दुपारी 11 ते 12.30 तुकाराम गाथा भजन,दुपारी  2 ते 5 महिला भजन, 5 ते 6 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11.30 हरिकिर्तन, 12 ते 4 हरिजागर अदि कार्यक्रम होणार आहेत.

मंगळवार दि. 26/12/2023 रोजी सकाळी 10 ते 12 ह.भ.प. भागवताचार्य महादेव धनके महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल नंतर  काल्याचा महाप्रसाद होवुन याचा सांगता होणार आहे. तरी या सोहाळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन हभप धनाजी कुरुंद महाराज धनेगाव यांनी केले आहे. 

सप्ताहात मुस्लीम बांधवाचे अन्नदान                               

धनेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात धर्माने मुस्लिम असलेले  ईस्माईल इब्राहीम मकाजी या मुस्लीम बांधवाने गुरुवार दि. 21 रोजी सकाळचे अन्नदान पंगत घेवुन सर्वधर्म समभाव जोपासल्याचे दिसुन येत आहे.


 
Top