धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता मराठा समाजाकडून आंदोनात्मक कार्यक्रम होत आहे. आगामी काळात मराठा आरक्षण अनुषंगाने होणारे विविध प्रकारची आंदोलने आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक, धाराशिव यांचे अध्यक्षतेत धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेतृत्व करणारे नेते व पदाधिकारी यांची जिल्हास्तरीय शांतता बैठक पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पार पडली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीकरीता राज्य शासनास दिनांक 24.12.2023 पर्यंत अतिंम मुदत दिलेली आहे. त्यानंतर आरक्षण न मिळाल्यास संपुर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. मराठा आराक्षण अनुषंगाने दिनांक 23.12.2023 रोजी जिल्हा बीड येथे मनोज जरांगे- पाटील यांची इशारा सभा आयोजीत केली आहे.
सदर बैठकीत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी उपस्थित नेते, पदाधिकारी यांचे म्हणने ऐकुन घेवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कायद्या व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून गंड व उपद्रवी लोकांना आंदोलनापासून दूर ठेवावे. त्याच प्रमाणे शांततेचा भंग होईल असे सोशल मिडियावरील जुने मेसेस, फोटो व दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कुलकर्णी यांनी केले.
