उमरगा (प्रतिनिधी)-राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्व करण्यासाठी राज्य शासनाच्या इतर मागास व बहूजन कल्याण विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, घरकुल योजनेतून उमरगा, लोहारा तालुक्यासाठी 400 घरकुल मंजूर झाले आहेत. या घरकुलांसाठी प्रत्येकी 1 लक्ष 20 हजार रुपये याप्रमाणे साधारण एकुण 4 कोटी 80 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, घरकुल योजना तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, घरकुल योजनेतून लोहारा तालुक्यातील माकणी, खेड, लोहारा खु., बेलवाडी, आरणी, अचलेर, आष्टा का., वसंतवाडी तांडा, दस्तापूर, धानुरी, जेवळी, करवंजी, करजगाव, कानेगाव, मार्डी, मोघा खु., मुर्षदपुर, नागूर, मुर्षदपूर तसेच उमरगा तालुक्यातील नाईकनगर (मु.), बेळंब तांडा, फुलसिंगनगर, तुरोरी, आष्टा ज., अंबरनगर, कंटेकुर, चिंचोली भू., कराळी, माडज, तलमोड येथील पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे. उमरगा व लोहारा तालुक्यासाठी वरील गावात 400 घरकुल मंजूर झाले आहेत. प्रत्येकी घरकुलासाठी 1 लक्ष 20 हजार रुपये याप्रमाणे एकुण 4 कोटी 80 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.
.jpg)