तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी मातेचा पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रोत्सवास गुरुवार दि. 18 जानेवारीला घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. गुरुवार दि. 25 जानेवारी शाकंभरी पोर्णिमेला दुपारी पूर्णाहुतीने शाकंभरी नवराञोत्सवाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी गुरुवार दि.11 जानेवारी ला सायंकाळी देवीजींच्या नवराञोत्सव पूर्वीचा मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे.
स्ञीशक्ती उत्सव,असणारा जलयात्रा सोहळा रविवार दि 22 जानेवारीला सकाळी संपन्न होणार आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे गुरुवार दि. 11 सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ, गुरुवार दि 18 रोजि पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता श्रीगणेश ओवरीत श्रीशांकभरी देवी प्रतिमा समोर दुपारी बारा घटस्थापना, रात्री छबिना शुक्रवार दि. 19 श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा, रात्री छबिना, शनिवार दि. 20 रोजी रथ अलंकार महापुजा, रात्री छबिना रविवार दि. 21 श्रीदेवीजींची मुरली अलंकार महापुजा, रात्री छबिना, सोमवार दि 22“ जलयाञा“ पापनाश तिर्थकुंडातुन सकाळी सात वाजता जलयात्रा आरंभ, दुपारी शेषशाही अलंकार महापुजा,रात्री छबिना, मंगळवार दि. 23 भवानी तलवार अलंकार महापुजा, रात्री छबिना, बुधवार दि. 24 अग्नीस्थापना, होमहवनास प्रारंभ, महिषासूर मर्दिनी अलंकार महापुजा, रात्री छबिना, गुरुवार दि. 25 शाकंभरी पोर्णिमा, घटोत्थापन, देवीची नित्योपचार पुजा, रात्री छबिना व जोगवा शुक्रवार दि26 देवीची नित्योपचार पुजा, अन्नदान महाप्रसाद, रात्री छबिना.
