उमरगा (प्रतिनिधी)- असिफ अयुब मुजावर रा. मुंशि प्लॉट उमरगा यांच्या मालकीची असणारी काल्या रंगाची फॅशन प्रो गाडी मोटार सायकल जेकेकुर शिवरातून कोणी तरी अज्ञात इसमाने चोरून घेऊन गेली आहे. अशा मजकुरावरून फिर्याद दाखल झाली होती. सदरची मोटार सायकल शोध कामी उमरगा पोलिस ठाणेची टीम शोध घेत असताना बायपास रोड उमरगा येथे एक संशयीत इसम स्प्लेंडर गाडीवर संशयीत रित्या फिरताना आढळून आला. त्यास चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील 6 मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश लक्ष्मण बाडगुळे वय 23 वर्ष रा. ईश्वर नगर, बसवकल्याण, जि. बीदर असे सांगितले. त्याचे जवळील गाडीचे कागदपत्र बद्दल विचारले असता त्याने गाडीचे कागद पत्र नसल्याचे सांगीतले. त्याबद्दल सखोल चौकशी केली असता सदर गाडी ईटकळ परिसरातून चोरी केल्याचे सांगितले आणि आणखीन चौकशी केली असता जेकेकुर परिसरातून चोरी गेलेली गाडी सुद्धा त्यानेच चोरल्याचे सांगितले. तसेच पोलिस स्टेशन लोहरा, नळदुर्ग, कासारशिरसी हद्दीतून वेगवेगळ्या कंपनीच्या 5 मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. सदर आरोपीकडून एकूण सहा मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक डि.बी.पारेकर पो स्टे उमरगा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक, गायकवाड,निलंगेकर, भराटे पोलीस हवालदार घोळसगावकर , अतुल जाधव पोलीस नाईक यासीन सय्यद, अनिरुद्ध कावळे, नवनाथ भोरे, पोकॉ बाबासाहेब कांबळे, सिध्देश्वर उंबरे, चालक विशाल कांबळे अदिनी विशेष कामगिरी बजावली आहे.


 
Top