भूम (प्रतिनिधी)- शंकर सर्जेराव माळी शिक्षक राहणार भूम यांचे मालकीचे एम.आय.डी.सी मध्ये एस. एम. इंडस्ट्रीज नामे कंपनी असून, या कंपनीमध्ये त्यांनी स्वतःच्या शेतात उत्पादित केलेले सोयाबीन भाव येईल या म्हणून साठवून ठेवले होते. दिनांक 19 डिसेंबर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून 72 कट्टे लंपास केले. शंकर माळी यांच्या फिर्यादीवरून भूम पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर माळी हे यांच्या इंडस्ट्रीज मध्ये काही अर्धवट कामे चालू असून त्या कामावरती ते दररोज सकाळी पाणी मारण्यासाठी जात असतात. तसेच त्यांनी दि. 20 डिसेंबर रोजी पहाटे पाणी मारण्यासाठी इंडस्ट्रीज भूम एमआयडीसी मध्ये गेले असता त्यांना काही ठिकाणी सोयाबीन पडल्याचे आढळून आले. त्यांनी गोडाऊनच्या खिडकीतून पाहिले असता 72 कट्टे सोयाबीन ठेवलेले दिसले नाही. त्यामुळे त्यांनी चारी बाजूने गोडाऊनला पाहिले असता एका बाजूच्या शटर तोडून सोयाबीन घेऊन गेले असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी शेजाऱ्यांना विचारणा केली असता कोणीही आम्हाला कल्पना नसल्याची सांगितले. अखेर भूम पोलिसात शंकर सर्जेराव माळी यांनी अज्ञात चोरट्याविरोधात 72 कट्टे सोयाबीन चोरीला घेऊन गेले असल्याची फिर्याद दिली. फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात भूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनखाली बीट अंमलदार क्षीरसागर हे करत आहेत.