धाराशिव (प्रतिनिधी)- ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. संचालित तेरणा शेतकरी सह. साखर कारखान्याच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता रु. 2,825/- बँकेस 4 डिसेंबर रोजी वर्ग करण्यात आले आहे.

जिल्ह्याचे पालक मंत्री तसेच राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत  यांनी या पूर्वी 12 वर्षे बंद असलेला तेरणा शेतकरी सह. साखर कारखाना चालवणे साठी घेऊन जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या तसेच कारखाना व्यवस्थापनातील कारखान्याचे चेअरमन मा. शिवाजीराव सावंत साहेब, कार्यकारी संचालक मा. श्री विक्रम (केशव) सावंत यांनी विशेष परिश्रम घेऊन अल्पावधीतच कारखाना मशीनरी मेंटनन्स ची कामे यशस्वीरित्या पूर्ण करून ऑक्टो-23 मध्ये कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपण समारंभ पार पडला.

दि. 14-11-2023 रोजी कारखान्याच्या प्रत्यक्ष ऊस गाळप हंगामाला यशस्वी रित्या सुरुवात झालेली आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यातील व कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना ऊस गाळप हंगाम सुरू करते वेळी आपल्या जिल्ह्याचे पालक मंत्री व कारखाना व्यवस्थापनाने चालू गळीत हंगामसाठी शेतकऱ्यांना पहिली उचल प्रती मे. टन रु. 2,825/- जाहीर केलेली होती तोच शब्द पाळत जयवंत मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी मार्फत कारखाना साईट तेरणा नगर ढोकी येथून शेतकऱ्यांना ऊस बिलाची पहिली उचल रु.2825/- प्रती मे. टन या प्रमाणे अदा करण्यास आणल्याची माहिती विक्रम ( केशव ) सांवत यांनी दिली आहे.

सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. भैरवनाथ शुगर वर्क्स लि, संचालित तेरणा शेतकरी सहकारी साखर लि तेरणा नगर ढोकी कारखान्यास जास्तीत ज्यास्त ऊस देऊन चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top