धाराशिव (प्रतिनिधी)-आरोपी ओंकार चंद्रशेकर पवार, रा. पाटोदा, ता. जि. धाराशिव यांनी दि. 30.11.2023 रोजी 16.00 वा. पुर्वी दिलीप दादा नाडे फार्मर ॲग्रीकलचेर प्राव्हेट लिमीटेड या कारखान्याला उस पुरवितो असा करार करुन 15 लाख रूपये एडव्हांस घेवून कारखान्याला उस न पुरविता त्याचे मालकीचे हार्वेस्टर मशीन व इनफिल्डर सह कारखान्याची फसवणुक करुन पळून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी राजेश विजयकुमार तवले, वय 42 वर्षे, व्यवसाय दिलीप दादा नाडे फार्मरॲग्रीकल्चर प्राव्हेट लिमीटेड रा. भंडारवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.24.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पोलिस ठाणे येथे कलम 419, 420 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top