भूम (प्रतिनिधी)- भूम शहरामध्ये तीर्थक्षेत्र अयोध्या श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाची मिरवणूक ता.25 डिसेंबर रोजी श्रीराम मंदिर कसबा येथून सकाळी अकरा वाजता काढण्यात आली. शोभायात्रा मुख्य बाजारपेठेतून भूम शहराचे ग्रामदैवत श्री अलंमप्रभू मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. 

यावेळी शहरातील प्रत्येक मंदिराच्यावतीने अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाची आरती करून स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व देवी देवतांच्या मंदिरातील पुजाऱ्यांना अयोध्या येथे होणाऱ्या 22 जानेवारी 2024 रोजीच्या प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. या शोभा यात्रेची सांगता श्री अलंमप्रभू मंदिरात करण्यात आले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षतांचा कलश श्रीराम भक्तांच्या दर्शनासाठी भूम नगरीचे ग्रामदैवत श्री अलंमप्रभू मंदिर येथे ठेवण्यात आलेला असून, सर्व श्रीराम भक्तांनी कलशाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top