तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वाभीमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथे होत असलेल्या बाविसाव्या ऐतिहासिक ऊस परिषदचा शुभारंभ श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातुन प्रज्वलित करुन नेण्यात आलेल्या भवानी ज्योतीने झाला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जय भवानी जय शिवराय या घोषनेने परिषद स्थळ दणाणुन गेले होते.                                      

मागील  गळीत हंगामाचे चारशे रुपये वाढीव हप्ता हा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आक्रोश पदयात्रा काढण्यासाठी आली. आजच्या ऊस परिषदेस तमाम महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे यांनी आई जगदंबे राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन संघर्ष करत आहेत त्यांना त्यात यश देण्याचे साकडे घालुन अंबेच्या दरबारात भवानी ज्योत प्रज्वलित करुन जयसिंगपूर येथे नेण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, विजय शिरसाठ, अनिल रांजणकर, दत्ताभाऊ गुंड,गुंडू तांबोळी तसेच साबीर शेख उपस्थित होते. 
Top