तुळजापूर (प्रतिनिधी)- हिंदू धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा  वर्षभरातील सर्व सणांमध्ये  मोठा असणारा दीपावली रविवार दि. 12 ते बुधवार दि. 15 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात दिपावली ऊत्सव विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसाचा उत्सव हिंदू धर्मिय मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतात. 

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसने सुरू होतो. गुरुवार 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस आहे. नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन रविवारी 12 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आहे. याच दिवशी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे राञी अंगावरुन आगीची ज्वाला वाहुन नेला जाणारा काळभैरवाचा भेंडोळी उत्सव पारंपारिक मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तुळजाभवानी मंदिरा भक्तांची दररोज प्रचंड गर्दी होत असून, आगामी सुट्ट्यांच्या काळासाठी मंदिर प्रशासनाने तुळजाभवानी मंदिर लवकर उघडण्याचे नियोजन केल आहे.

तुळजाभवानी मंदिरातमंगळवार 14 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज सण आहे. दिवाळी तेलाचे दिवे ज्योत पणत्या, दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव चार दिवस साजरा केला जातो.


 
Top