नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर तालुक्यातील फुलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर प्रवाशी तसेच वाहन चालकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत.टोलनाक्यावरील स्वच्छता गृहात पाण्याची व्यवस्था नसल्याने हे स्वच्छता गृह घाणीने तुडुंब भरले आहेत. वाहन चालकांकडुन टोल वसुल करणाऱ्या कंपनीने टोलनाक्यावर वाहनचालक व प्रवाशांना मुलभुत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असतांना या टोलनाक्यावर वाहन चालक व प्रवाशांना मुलभुत सुविधा उपलब्ध करून न देणाऱ्या टोल कंपनीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडी येथे टोल नाका आहे. वास्तविक पाहता या टोलनाक्यावर सुरू असलेली टोल वसुली ही चुकीची आहे. कारण अद्यापही या महामार्गाचे काम पुर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले आहेत. महामार्गाचे मोठी दुरवस्था झालेली आहे तरीही याठिकाणी टोलनाक्यावर वाहन चलकांकडुन टोल वसुली केली जात आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजुनही अर्ध्यावरच रखडत पडले आहे.

 या टोलनाक्यावर टोल वसुली जोरात सुरू आहे जी कंपनी ही टोल वसुली करीत आहे ती कंपनी या टोलनाक्यावर वाहन चालक व प्रवाशांना मुलभुत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे. टोल नाक्यावर असलेल्या स्वच्छता गृहात पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे या स्वच्छता गृहात प्रचंड घाण साचली आहे. पुरुष व महिलांच्या स्वच्छता गृहात पाण्याची व्यवस्था नसल्याने याठिकाणी दुर्गंधी सुटली आहे. टोल वसुल करीत असताना टोल वसुली करणाऱ्या कंपनीने टोलनाक्यावर वाहनचालक व प्रवाशांना मुलभूत सुविधा पुरविणे हे बंधनकारक आहे. मात्र या टोलनाक्यावरची अवस्था अतीशय वाईट आहे. टोल वसुल करण्यात मग्न असणारी कंपनी टोलनाक्यावर सुविधा  उपलब्ध करून देण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. टोलनाक्यावर अशी अवस्था असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष नसल्याचे दिसुन येत आहे.


 
Top