तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अनेक तलावामधुन आजही पाणी उपसा चालु असल्याने तो रोखावा व साठवण तलावातील पाणीसाठा राखीव ठेवावा अशी मागणी शेकाप ने तहसिलदार यांना निवेदन देवुन केली आहे. 

तालुक्यात सरासरी पेक्षा पाऊस अतिशय कमी झालेला आहे. त्याचबरोबर परतीचा पाऊस अजिबात झालेला नाही त्यामुळे तालुक्यातील कुठलेच तलाव पुर्ण पणे भरले नाहीत म्हणुन आपल्या तालुक्यातील शहर व गावांना पुढील काळात पाणी टंचाई जाणवणार आहे. त्याच बरोबर पाळवी प्राणी आणि जंगलातील पशु पक्षी यांना पिण्याचे पाण्याची गरज भासणार आहे. यांची तहान भागवण्यासाठी जिल्हा, तालुका प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन सर्व तलावातील पाणी उपसा त्वरीत बंद करावा बऱ्याच तलावामध्ये पाणी उपसा चालु आहे. तेथील शेतकऱ्यांना पाणी उपसा बंद करण्यास अधिकृत सुचना द्याव्यात, या वर्षात उन्हाळा सुध्दा कडक जाणवणार आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्ती होण्याची शक्यता आहे. यामुळे वन्य प्राणी व शेतकऱ्यांचे पशुधन यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तरी तालुक्याती साठवण व पाझर तलावातील पाणी राखीव ठेवावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष यांनी केली आहे. तरी ज्या तलावात भरपूर पाणी आहे तेथील पाणी टँकरद्वारे उचलुन जंगलातील साठवण तलावात टाकण्यात यावे जेणे करुन वन्य प्राणी पक्षी यांची सोय होईल आणि यामुळे हिंस्त्र वन्य प्राणी शहरात, गावात पाण्यासाठी भटकंती करणार नाहीत. यामुळे गावात व शहरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना हिंस्त्र प्राण्या पासुन धोका होणार नाही. हे निवेदन उत्तम अमृतराव यांच्या नेतृत्वाखाली शेकाप कार्यकत्यांनी दिली.


 
Top