तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत करण्यात आलेल्या सिग्नल व्यवस्था चालु झाल्या पासुन बंद अवस्थेत असल्याने सध्या वाहतुक कोंडी पार्श्वभूमीवर चौकांमध्ये बंद सिग्नल खाली वाहतूक सुरुळीत करणारे कर्मचारी तैनात करावे लागल्याने सिग्नलसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे.
दिपावली सुट्यांच्या पार्श्वभूमी संख्येने भाविक खाजगी वाहनांनी आल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात सातत्याने वाहतुक कोंडी होवुन लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कर्मचारी तैनात करावे लागत आहेत. सिग्नल व्यवस्था बंद असल्याने वाहतुक सुरुळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा खर्चाचा भुर्दंड पडत आहे. सध्या तिर्थक्षेञ तुळजापूर येथे वीस ते पंचवीस हजार वाहने आल्याने जुना बसस्थानक चौक, शिवाजी महाराज चौक, बार्शी टी पाँईट चौक येथे सातत्याने वाहतुक कोंडी होत होती. आज शहराला वाहनतळाचे रुप प्राप्त झाले होते.