धाराशिव (प्रतिनिधी)-क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे दिनांक 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत धाराशिवची होनरबाज रणरागिनी कला सायन्स व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ची विद्यार्थीनी पैलवान पोर्णिमा खरमाटे हिने लातूर विभागाचे नेतृत्व करत असताना 19 वर्षाखालील 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. 

तिचे राष्ट्रीय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या तिच्या अबूतपूर्व यशाबद्दल संपूर्ण धाराशिव नगरीत कौतुक होत आहे. तसेच कुस्ती क्षेत्रामध्ये पौर्णिमेला राज्यस्तरीय स्पर्धेत दोन वेळा ब्रांच तीन वेळा सिल्वर व तीन वेळा गोल्ड मेडल मिळाले. तसेच जुडो क्रीडा प्रकारात क्रीडा प्रकारात एक वेळा गोल्ड एक वेळा सिल्वर पदक मिळाले अशीही गुणवंत खेळाडू तिला तीन वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा बहुमान मिळाला ती ती क्रीडा महर्षी शिवाजीराव नलावडे कुस्ती संकुल धाराशिव व सह्याद्री इंटरनॅशनल कुस्ती संकुल पुणे येथे सराव करत आहे या यशासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप वांजळे विजय काका बराटे वामनदादा गाते संतोष नलावडे उदय काकडे आनंद केंद्रे वस्ताद दिनकर जाधव वस्ताद सुंदर भाऊ जवळ देवस्थान गणेश सप्ते वस्ताद गोविंद घाडगे वस्ताद गोडसे सर मनोज जाधवर प्रशांत निंबाळकर व क्रीडाशिक्षक कपिल सोनटक्के सर या मान्यवरांचे अबूतपूर्व मार्गदर्शन लाभले तिच्या या आजपर्यंतच्या यशामुळे सर्व क्रीडा नगरीत कौतुक होत आहे व अभिनंदन होत आहे व तिला राष्ट्रीय क्रीडा राष्ट्रीय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.


 
Top