धाराशिव (प्रतिनिधी)-गळीत हंगाम 2023-24 मध्ये दि.21-10-2023 ते 31-10-2023 या कालावधित गाळपास आलेल्या ऊसाचे राहिलेले फरक बिल 100 रूपये व दि.01 नोव्हेंबर ते  15 नोव्हेंबर 2023 या कालावधित गाळपास आलेल्या ऊसाचे 2800 रूपये प्रमाणे बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून पंधरवाडी बिल काढताना प्रोसिजरला विलंब न लावता दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांचे बील जमा केले.

तरी शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे.असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.


 
Top