धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. कारखान्याने 2023-24 च्या चाचणी गळीत हंगामात गाळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. कारखान्याला 21/10/2023 ते 31/10/2023 या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे ऊस बिल रू.2700/- प्रमाणे बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले असल्याची माहिती संस्थापक चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी दिली. 

ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी ठेवून एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्याने मोळीपूजन कार्यक्रमातच शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 21/10/2023 ते 31/10/2023 या कालावधीत गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल 2700 रुपयेप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. तरी शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे, असे चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


 
Top