धाराशिव (प्रतिनिधी)- घर घर दिवाळी ह्या कार्यक्रमा अंतर्गत रोटरी क्लब आणि  रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या मार्फत 84 गरजू  लोकाना  (विशेषतः  एकल  महिलांना)  प्रत्येकी रुपये  1000/- किमतीचा दिवाळी फराळ शिधा आंबेहोळ, घाटंग्री, पाडोळी, शिंगोली व धाराशिव येथे वाटण्यात  आला.  क्रिएट होप या रोटरी कार्यक्रमाला अनुसरून आपण ह्या  थोड्याशा मदतीने त्यांची दिवाळी पण गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.  ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष  रो. अनार साळुंके, सचिव  रो. मीना जिंतूरकर, माजी प्रांतपाल रो. रविन्द्र साळुंके, प्रकल्प प्रमुख रो. रणजित  रणदिवे आणि  रो. चंदन भडंगे, रो. प्रदीप मुंढे, रो. अभिजीत  पवार, कोषाध्यक्ष रो.किरण देशमाने तसेच जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालयचे कर्मचारी ही उपस्थित होते.


 
Top