परंडा (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारणी सभा मा.विजय कोंबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.यावेळी राज्य नेते मा.उदय शिंदे साहेब,राज्य सचिव.राजन कोरगावकर,राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, आनंदा कांदळकर, राज्य कोषाध्यक्ष नंदू होळकर,राज्य संघटक राजेंद्र खेडकर,राज्य प्रवक्ता नितीन नवले,ऑडिटर पंडित नागरगोजे, जुनी पेन्शन प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,मनपा व नप प्रमुख सुधाकर सावंत,मराठवाडा प्रमुख श्री.श्याम राजपूत,शिवाजी कवाळे सहित मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष तसेच धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा उपाध्यक्ष विलास कंटेकुरे उपस्थित होते.

यावेळी मा. कोंबे साहेब यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कामाचा आढावा घेतला व येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे,समूह शाळा योजना बंद करणे,उपस्थिती भत्ता वाढ करणे,संचमान्यता,आंतर जिल्हा बदली,शाळाबाह्य कामे BLO चे काम काढून घेणे NPS/DCPS बाबत,तसेच निरंतर शिक्षण प्रशिक्षण बाबत अशा विविध विषयावर  महामोर्चा काढण्यात येणार आहे असं आपल्या मनोगतात  सांगितले तसेच यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून नियोजन करण्याबाबत सुचना केल्या. तसेच संघटनेच्या कामाविषयी माहिती दिली.येत्या काळातील संघटनेचे ध्येय धोरण याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी धाराशिव  जिल्हा कार्यकारणी ची निवड करण्यात आली.यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी श्री.रमेश शिवाजी बारसकर तर बशीर तांबोळी यांची राज्य कार्यकरणी सदस्य तसेच जिल्हा सरचिटणीस श्री.लक्ष्मण बनसोडे तर जुनी पेन्शन संघटना जिल्हाप्रमुख पदी श्री.सचिन भांडे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

यावेळी राज्य उपाध्यक्ष कल्याण बेताळे, बाळासाहेब वाघमारे, बाबुराव कोकाटे, शिशुपाल पुरी,डी. डी. हुंडेकरी, रामदास होरे, शिवाजी वाघमारे, नागनाथ देशमुख, युवराज खाडे, लहू मासाळ, सतीश हुंडेकरी, उमेश खोसे, कमलाकर येनेगुरे, बिलाल सौदागर, महेन्द्र रणदिवे, लक्ष्मण ताणले, भिमाशंकर डोकडे, राजेंद्र गाडे, चिनगुंडे सोमनाथ, विलास औंधकर, मालोजी वाघमारे , भैरवनाथ झांबरे, संतोष देवकर, विलास तोरसल्ले, महादेव विटकर, राहूल अपसिंगकर, रामदास गायकवाड, प्रदिप टाक सर यांसह जिल्हा कार्यकरणी तसेच सर्व तालुक्याचे आजी,माजी पदाधिकारी व समितीचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top