धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा मॉडर्न पेन्टॅथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 5 ते 6 नोव्हेंबर 2023 दरम्यान  रॉयल स्विमिंग पूल तुळजापूर या ठिकाणी विभागस्तर शालेय मॉडर्न पेन्टॅथलॉन स्पर्धा उत्साहात सपंन्न झाल्या. या स्पर्धेत धाराशिव,लातूर व नांदेड जिल्हातील 60 खेळाडूंनी सहभाग नोंदवला

विभागीय स्पर्धेचा निकाल व राज्य स्पर्धेसाठी निवड पुढील प्रमाणे -17 वर्ष मुले - 1 ओंकार भोसले, प्रवीण जाधव, कर्ण धनके सर्व धाराशिव, हर्षवर्धन मोघे लातूर, 17 वर्ष मुली - श्रावणी जगताप लातूर, श्रावणी रणखांब धाराशिव, गार्गी सूर्यवंशी लातूर, सायुज्य रणदिवे धाराशिव, 19 वर्ष मुले - राजवर्धन मोघे,मयांक बंडेसर्व लातूर,विराज जाधवर, माउली पवार सर्व धाराशिव,19 वर्ष मुली - ज्योत्स्ना लईतबार धाराशिव.

वरील सर्व विजयी खेळाडूंना सोमनाथ माळी तहसीलदार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, बी. के. नाईकवाडी तालुका क्रीडा अधिकारी,मॉडर्न पेन्टॅथलॉनचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर भुतेकर, तालुका क्रीडा संयोजक राजेश बिलकुले यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे पंच म्हणून प्रवीण केवडकर, इसाक पटेल, अजिंक्य वराळे, योगेश थोरबोले, बालाजी पवार, गणेश रणखांब, योगिनी साळूंखे यांनी पाहिले.


 
Top