धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदार संघातील संपूर्ण धाराशिव जिल्हा व सोलापूर जिल्हयातील बार्शी तसेच लातूर जिल्हयातील औसा व निलंगा इत्यादी तालुक्याचा समावेश होतो. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदार संघातील उर्वरीत सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्याचे मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्य शासनाने दि. 31 ऑक्टोंबर 2023 रोजी दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्याच्या यादीमध्ये फक्त धाराशिव जिल्हयातील वाशी, धाराशिव व लोहारा तसेच सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्याचा समावेश आहे. धाराशिव जिल्हयातील उर्वरित कळंब, परंडा, भुम, तुळजापुर, उमरगा व लातुर जिल्हातील औसा व निलंगा इत्यादी तालुके दुष्काळी  स्थिती असताना देखील शासनाने जाहीर केलेले नाहीत. वास्तवीक पाहता खरीप हंगाम 2023 मध्ये उर्वरित तालुक्यात देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून महसूल कार्यालयात नोंद देखील आहे. या तालुक्यातील खरीप हंगामात सोयाबीन व इतर पिकाचे सरासरी उत्पादन हे 50% कमी झाले आहे. या तालुक्यातील पाणी पातळीत प्रचंड घट झालेली आहे. त्यामुळे शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन माझ्या धाराशिव लोकसभा मतदार संघातील कळंब, परंडा, भुम, तुळजापुर, उमरगा व लातूर जिल्हयातील औसा व निलंगा इत्यादी तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर करण्यात यावे. अशी मागणी राज्याचे मंत्री ना. अनिल पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.  


 
Top