धाराशिव(प्रतिनिधी)-येथील लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे मुंबई विद्यापीठाला डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणामधील लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अ.ब.क.ड. वर्गीकरणानुसार वेगळा वाटा मिळावा. मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू भाऊ कसबे यांनी 16 नोव्हेंबर 2023 पासून पुणे ते नागपूर पदयात्रा सुरू केलेली आहे. या पदयात्रेची गांभीर्याने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्या अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांद्वारे केली आहे.
या प्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवाजी गायकवाड,लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते प्रा.डॉ.मारुती लोंढे, डॉ.संगीता बावस्कर, मारुती क्षीरसागर,संतोष मोरे आणि असंख्या पदाधिकारी उपस्थित होते.