धाराशिव (प्रतिनिधी)- दुधापासून तयार होणाया पदार्थांना चांगली मागणी असताना मागील महिन्यामध्ये दुधाच्या दरामध्ये लिटरमागे पाच रुपयाची घसरण झालेली आहे. शासनाने तात्काळ दुध दरवाढ करून गाईच्या दुधास 40 व म्हशीच्या दुधाला 60 रुपयेप्रमाणे दर देऊन शेतकयांना आर्थिक नुकसानीपासून वाचवावे, अन्यथा येत्या चार दिवसात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना बुधवारी (दि.22) दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, मागील तीन महिन्यापूर्वी गाईच्या दुधाची किंमत 38 रुपये प्रति लिटर होती. ती आज 26 रुपये झाली आहे. अगोदरच विविध आजाराच्या अनुवंशिकतेमुळे दुधाचे उत्पादन घटले असून चाऱ्याच्या किमती व पशुखाद्याचे भाव वाढलेले आहेत. असे असताना दुधाचे दर घसरल्यामुळे शेतीलापूरक उद्योग असणारा दूध व्यवसाय अडचणीत येऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दूध पावडर निर्यात होत नसल्याने दुधाचे भाव कमी झाल्याचे दूध खरेदीदार सांगत आहेत. यापुढील काळात दुग्ध संस्था व खाजगी दूध संघ दूध दर आणखी कमी करण्याच्या विचारात आहेत, असे समजते. एकीकडे दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दरही पाच हजारापर्यंत येऊन थांबलेले आहेत. शेतकयांचे सोयाबीन मुख्य पिक एकरी तीन क्विंटल उत्पन्न, अत्यल्प पावसामुळे रब्बीची पेरणी 30 टक्केच झालेले आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात अनेक शेतकयांनी आत्महत्या केल्या असून त्यातच शेतकऱ्यांना जोड व्यवसाय असणाया दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे. याची शासनाने दखल घेऊन तात्काळ दुध दरवाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीपासून वाचवावे, अन्यथा येत्या चार दिवसात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदनात दिला आहे.