भूम (प्रतिनिधी)-आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी सचीन खाडे तहसीलदार भुम, सुरेश गायकवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती भुम यांनी विकसित भारत संकल्प यात्रा व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून भुम तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीसाठी व्हॅन रवाना झाली सदरील व्हॅनमध्ये केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वंचित घटकांना सामावून घेण्यासाठी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांनी उपस्थित राहुन आपल्या विभागाच्या योजना गावातील शेवटच्या घटकांपर्यंत जाव्यात या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ झाला.
सदरील व्हॅनचा कार्यक्रम दिनांक 23 नोव्हेंबर 2023पासुन चिंचोली सकाळी व संध्याकाळी रामेश्वर पासुन सुरुवात झाली असुन दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा व्हॅन तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणार आहे. यावेळी सचिन खाडे तहसीलदार,सुरेश गायकवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती भुम, वसंत वाघमारे विस्तार अधिकारी पंचायत समिती भुम, संजय स्वामी मंडळ अधिकारी, व्ही.बी.कोळी मंडळ अधिकारी, गहीनीनाथ कांबळे तालुका समन्वयक स्वच्छ भारत मिशन, श्री युसुफ शेख तालुका समन्वयक आपले सरकार, उत्तम गुळवे ग्रामविकास अधिकारी,पत्तेवाड, नांगरे, उपस्थित होते.