तुळजापूर (प्रतिनिधी)-महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळल्याने देशात राज्यात तालुक्यात सत्तांतर रुपाने परिवर्तन अटळ असुन पुनश्च  महाविकासआघाडी सत्तेवर येईल असे प्रतिपादन माजी मंञी माजी मधुकर चव्हाण यांनी बुधवार दि. 15 नोव्हेंबर रोजी पञकारांशी संवाद साधताना केले. प्रारंभी काटी येथील ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच जुबेर हारूण शेख यांनी भाजप मधुन माजी मंत्री मधुकरराव देवराव चव्हाण उपस्थित काँग्रेस पक्षात स्वगृही केला.

यावेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले कि तालुका व शहरातील लोकांच्या समस्था मागील चार वर्षा पासुन जैसे थे आहे. विकास कुठे सापडत नाही. मतदार यांच्या कारभाराला कंटाळली आहे. याची जायची विसर्जन व्हायची वेळ आली आहे. सध्या काँग्रेसमध्ये येण्यासाठी जिल्हयातुन मोठ्या संखेने येण्यास इछुक आहेत. यापुढे काँग्रेस जिल्हा परिषद गट निहाय मेळावे घेवुन जनजागृती करणार असल्याचे शेवटी म्हणाले. यावेळी  ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच जुबेर शेख यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण  यांनी सत्कार केला. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, युवा नेते ऋषिकेश मगर, युवा नेते अमोल कुतवळ, सुनिल रोचकरी, रणजीत इंगळे, आनंद जगताप, भोकरे दादा, विलास सरडे, काशिनाथ बंडगर, रामेश्वर तोडकरी, गौरीशंकर कोडगीरे, अशोक जाधव, सयाजीराव देशमुख, सचिन भोजने, चंद्रकांत काटे, अमोल गावडे, आबा गाढवे, श्रीकांत रसाळ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top