तुळजापूर (प्रतिनिधी)-स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची 135 वी जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीने शनिवार दि.11 नोव्हेंबर रोजी  आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप,सिंदफळ येथील कब्रस्तान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक भाई शेख, तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, ज्येष्ठचे जिल्हा अध्यक्ष धनंजय पाटील,ज्येष्ठ नेते बापूसाहेब नवगिरे,तालुका उपाध्यक्ष रुबाब भाई पठाण, शहराध्यक्ष अमर नाना चोपदार, युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे,युसुफ भाई शेख, आरिफ भाई बागवान, मतीन भाई बागवान, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद भाई शेख, शहर उपाध्यक्ष मकसूद भाई शेख, अल्पसंख्यांक विधानसभा अध्यक्ष इब्राहिम इनामदार ,युवक तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे,  युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर,गणेश ननवरे, पैगंबर शेख, अजीम शेख, दत्ता व्यवहारे,बुरहान इनामदार ,हुसेन इनामदार ,एजाज बागवान,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थीत होते.


 
Top