धाराशिव (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथील क्रीडा महर्षी शिवाजीराव नलावडे कुस्ती संकुलामध्ये 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजना संदर्भात या स्पधेचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष आयोजक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय, विविध संस्था पदाधिकारी व जिल्हाभरातील कुस्ती तालीम मल्ल सर्व प्रतिष्ठित व्यक्ती धाराशिव शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. 

तर या स्पर्धेच्या कार्यालयांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.या स्पर्धेसाठी स्थापन केलेल्या विविध समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तर तज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे असे आयोजक सुधीर पाटील यांनी या वेळी सांगण्यात आले. तसेच सुधीर पाटील यांनी आपल्या भाषणात कुस्तीला या स्पर्धेच्या निमित्ताने चांगले दिवस येतील व तरुणांना शरीर संपदेचे वेड लागेल व त्याचबरोबर या स्पर्धेचे नियोजन, व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती दिली. तर काकासाहेब पवार व अभिराज पाटील यांनीही मार्गदर्शन केले. राजाभाऊ कोळी यांनी महाराष्ट्रातून 900 कुस्तीगीर व 200 पंच, मार्गदर्शक व कुस्ती महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या कुस्ती स्पर्धेसाठी ज्या प्रायोजकांनी या स्पर्धेसाठी बुलेट दिली त्या सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

या बैठकीस काकासाहेब पवार, अभिराम पाटील, आदित्य पाटील, भाऊसाहेब उंबरे, महेंद्र धुरगुडे, सुनील काकडे, विधिज्ञ खंडेराव चौरे, सतीश देशमुख, युवराज नळे, संदीप इंगळे, धंनजय देशमुख, सुधाकर अबदारे, प्रदीप इंगळे, विशाल शिंगाडे, डॉ. चंद्रजित जाधव, आबा इंगळे, इंद्रजित देवकते, नवनाथ जगताप, शेषेराव उंबरे, स्वप्नील पाटील, प्रमोद कदम, शेषनाथ वाघ, कमलाकर पाटील, नेताजी मुळे, बाळासाहेब शिंदे, खोबडे गुरुजी, जवळगे पैलवान, मोहन मुंडे, राजाभाऊ कोळी, शिवाजी पंगुडवाले, ओंकार नायगावकर, सर्जेराव जवळगे, बालाजी तांबे, दिनकर जाधवर, दयानंद साळुंके, लक्ष्मण माळी हातलाई कुस्ती संकुल सर्व मल्ल कुस्ती प्रेमी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे सुत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. तर आभार अभिराम सुधीर पाटील यांनी मानले.


 
Top