तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर शहरासह परिसरात असणाऱ्या अनेक गावांतशा शुक्रवार दुपारी अर्धा तास पाऊस पडला. यात तुळजापूर, मंगरुळ भागात  झालेल्या पावसाने झोडपुन  काढले चार वाजता सुरु झालेला पाऊस अर्धा तास मुक्त पणे बरसल्याने शहरात सर्वञ पाणीच पाणी झाले होते. या पावसाचा लाभ रबी पेरणी साठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. सदरील पाऊस हा तुळजापूर मंगरुळ आपसिंगा भातंब्री सिंदफळ भागात पडला या झालेल्या पावसामुळे उपलब्ध ओलीवर ज्वारी पेरणी करण्याचा मनस्थितीत बळीराजा आहे. 

अजुन चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने हा अंदाज बळीराजाला दिलासा दायक आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांतूनसमाधान व्यक्त होत आहे. रबी पेरणी साठी आणखी पावसाची गरज आहे. परंतु द्राक्षबागायतदार अन्‌‍ ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पिके निघाली नाहीत, त्यांचे नुकसान होणार आहे. पाऊस चालु होण्यापुर्वी व झाल्यानंतर माञ सातत्याने शहरातील वीज पुरवठा खंडीत होत होता.


 
Top