नळदुर्ग (प्रतिनिधी)- धनत्रयोदशी निमित्त नळदुर्ग येथील पाटील क्लिनिक येथे धन्वंतरीचे पुजन करण्यात आले.

धनतेरस ही धन्वंतरीची पुजा आहे. धन्वंतरी हिंदु परंपरेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी उदयास आले आहे. धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता मानली जाते. दि.10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी निमित्त नळदुर्ग येथील पाटील क्लिनिक येथे धन्वंतरीचे पुजन करण्यात आले. धन्वंतरीचे पुजन डॉ. जितेंद्र पाटील व पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, संजय दशरथ जाधव, पत्रकार उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, शिवसेनेचे बंडप्पा कसेकर, दिनेश बाळूरकर यांच्यासह क्लिनिकमधील सर्व कर्मचारी होते.


 
Top