धाराशिव (प्रतिनिधी)-वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व पेालीसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुरुम पोलीस स्टेशनचे वतीने लोक सहभागातुन पारंपारिक पध्दतीने रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावामध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातुन गावातील लोकांचे घरे, बॅका, एटीएम, सोनाराची दुकाने इत्यादी ठिकाणी गस्त घालून चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुरुम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून ग्राम सुरक्षा दल संकल्पने नुसार रात्रीची गस्त सुरु झालेले असुन गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने ग्रामसुरक्षा दलामध्ये सहभाग नोदंवला असुन उत्स्फुर्तपणे रात्रीची गस्त करत आहे. 

यावेळी माजी जि.प.सदस्य रफीक तांबोळी, पत्रकार शरद गायकवाड सहा गावचे पोलीस पाटील, येणेगुर पोलीस दुरक्षेत्राचे सफौ शिंदे पोलीस अंमलदार- मडोळे, व्हर्टे, मसाळ, उपस्थित होते. यावेळी सपोनि शेंडगे, सपोनि इंगळे यांनी मार्गदर्शन केले. मुरुम पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सुरक्षा दल हे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन यांचे आदेशावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, सपोनि  पवन इंगळे, पोउपनि शिंदे, व मुरुम पोलीस स्टेशन चे अमंलदार हे ग्रामसुरक्षा दल संकल्पना यश्स्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे.



 
Top