तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान च्या वतीने रविवार दि26रोजी , माहे कार्तिक त्रिपुरारी (बसवण्णे) पौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे ञिपुरारी पोर्णिमा बसवण्णे पोर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
यात माती किंवा साखरचे मंदिर तयार करुन त्यात महादेव पिंड ठेवली जाते. या महादेव पिंडीचे पुजन छोट्या कुमारीका साडी नेसुन डोक्याला फुलांचे मुंढवळे बांधुन देवघरात ठेवलेल्या मंदिरातील महादेव पिंडीचे पुजन करुन नैवध दाखवितात व नंतर श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदिरात जावुन देविचे दर्शन घेतात. ञिपुरारी पोर्णिमा पार्श्वभूमीवर शनिवार दि 25 नोव्हेंबर रोजी राञी छबिना काढण्यात येणार आहे. रविवार दि. 26 नोव्हेंबर दिवसभर पोर्णिमा धार्मिक विधी होणार आहेत. नंतर राञी मंदिर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर प्रक्षाळपुजा नंतर देविचे महंत वाकोजीबुवा, गुरुतुकोजीबुवा हे उपरण्यात जोगवा मागुन ञिपुरारी पोर्णिमेच्या धार्मिक विधीचा सांगता होणार आहे. नंतर सोमवार व मंगळवार राञी छबिना काढण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी दिली आहे.