धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे धाराशिव तालुक्यातील शिंगोली विभाग प्रमुखपदी बुबासाहेब पवार यांची तर पाटोदा व करजखेडा गण प्रमुखपदी विकास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांच्या हस्ते धाराशिव तालुक्यातील शिंगोली विभाग प्रमुखपदी बुबासाहेब पवार यांची तर पाटोदा व करजखेडा गण प्रमुखपदी विकास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. येणाऱ्या काळामध्ये आपण जिल्हा परिषद गट  व गणामध्ये उत्कृष्ट असे कार्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गाव पातळीवर संघटन बांधणी करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट करणार असा विश्वास व्यक्त केला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, सेवादल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, युवा नेते मलंग शेख, केशेगाव गटप्रमुख लिंबराज लोखंडे, अंबेजवळगे  जि.प गटप्रमुख सुरेश राठोड, शाखा अध्यक्ष चंद्रकांत राठोड आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top