भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील वालवड येथील सेवानिवृत्त पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चुंबळी रोड वरून घराच्या पाठीमागील सीताफळाच्या बागेमधून येऊन आठ चोरट्यांनी दरोडा टाकून जबरदस्तीने मारहाण करून वीस हजार रुपये रोख याच्यासह साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला.

पोलीस सूत्राकडून मिळाल्या माहितीनुसार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोणीतरी दोन व्यक्ती पोर्च मध्ये असल्याचे शिंदे यांच्या पत्नी यांनी शिंदे यांना सांगितल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करताच चोरांनी दरवाज्याच्या कडी कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. मास्क परिधान केलेले चोरांनी  शिंदे व त्यांचे पत्नी यांना काठीने व रोडने मारहाण केली. दमदाटी करून गळ्यातील गंठण जबरदस्तीने काढून घेतले. तसेच कपाटा मधील दागिने व रोख रक्कम काढून घेतली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त टाकून देते घरामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले. 397,457,380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, वालवड गावातील सीसीटीव्ही मार्फत तपास घेण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील एकूण सहा टीम तपास करीत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी व पोलीस शिपाई एन. एम. जाधव अधिक तपास करत आहेत.

मी माझ्या मुलीकडे दिवाळीनिमित्त दोन दिवस सांगोला येथे गेलो होतो. त्यामुळे घरामध्ये कोणीच नव्हते याची पाळत राखत चोट्यांनी आम्ही घरी नाही असे समजून रात्री साडेबारा वाजण्याची सुमारास आमच्या घरामध्ये कडी तोडून प्रवेश केला. मला व माझ्या पत्नीला मारहाण करून घरातील रोख रक्कम व दागिने घेऊन दरोडेखोर निघून गेले अशी माहिती माजी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांनी दिली.


आमच्या दोन ते तीन टीम चोरांच्या मागावर असून लवकरात लवकर चोरांना पकडू त्या दिशेने आमचा तपास चालू आहे.

कुणाल सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूम पोलिस ठाणे.



 
Top